बाबा रामदेव यांच्या योगाची गिनिज बुकात नोंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन,कोटा

आंतरराष्ट्रीय योगदिनी योगगुरू बाबा रामदेव यांनी दोन लाखांहून अधिक लोकांसोबत एकाच वेळी योग करीत विश्वविक्रम केला आहे. राजस्थानच्या कोटा शहरात झालेल्या विक्रमाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे.

आंतरराष्ट्रीय योगदिनाचे यंदाचे चौथे वर्ष आहे. यानिमित्त राजस्थान सरकारने आज योग कार्यक्रमाचे आयोजन केले. यावेळी मुख्यमंत्री वसुंधराराजे उपस्थित होत्या. तब्बल दोन लाखांपेक्षा अधिक लोकांनी या कार्यक्रमात भाग घेतला. यामध्ये विद्यार्थ्यांची संख्या अधिक होती. विद्यार्थ्यांना तणावमुक्त करण्यासाठी योग सर्वात योग्य पद्धत असल्याचे बाबा रामदेव यांनी सांगितले. या कार्यक्रमाला गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डची टीमदेखील उपस्थित होती. बाबा रामदेव यांनी २०१७ मध्ये ५४, ५२२ लोकांसमवेत योग करून गेल्या वर्षी गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवले होते. त्याआधी त्यांनी पंतप्रधानांच्या उपस्थितीत ३५,९८४ लोकांसोबत एकत्र योगाभ्यास केला होता.