
कर्ज तसेच आर्थिक विवंचनेतून पारनेर तालुक्यातील वनकुटे येथील सुनिल तुळशीराम भगत (34) या तरूणाने गळफास घेउन आत्महत्या केली. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत सुनिल हे वनकुटे येथे दुचाकी दुरूस्तीचे काम करीत होते. मंगळवारी सकाळी न्यायालयात काम असल्याने ते सकाळीच वनकुटे येथून निघाले होते. वडीलांकडे तिन हजार रूपयांची मागणी केल्यानंतर वडीलांनी त्यास केवळ 300 रूपये दिले. त्याचा राग त्याच्या मनात असल्याचे सुनिल यांनी गळफास घेतल्यानंतर लिहून ठेवलेल्या चिठठीतील मजकुरावरून उघड झाले. नाना नानी तुम्हाला पैसा प्यारा आहे, मुले नाहीत असा मजकुरही या चिठठीत आहे. सरपंच राहुल झावरे हा माझा भाऊ आहे, त्याने माझे दुकान विकावे व कर्जाची रक्कम भरावी. नाना, नानीला पैसे मागू नये, असेही या चिठ्ठीत नमुद करण्यात आले आहे. दरम्यान, पोलिसांनी ही चिठ्ठी ताब्यात घेतली असून त्यानुसार तपास करण्यात येत आहे.


























































