नमाज पठणासाठी मशिदीत गेलेल्या सपा कार्यकर्त्यावर चाकूने हल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । लखनौ

उत्तर प्रदेशमध्ये एका तरुणाने पूर्व वैमनस्यातून सपा कार्यकर्त्यावर चाकूने हल्ला केला आहे. हल्ला केल्यानंतर आरोपीने पळ काढला असून सपाचा कार्यकर्ता चांगलाच जखमी झाला आहे. त्याला जवळच्या इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.

लखीमपुरा भागात मुन्ना नेता हे सपाचे कार्यकर्ते आपल्या मुलासोबत जुन्या मशिदीत नमाज पठणासाठी जात होते. तेव्हा एक मशिदीच्या जवळच राहणारा तरुण आला आणि आणि धारदार चाकूने मुन्ना यांच्यावर हल्ला केला.  ताहिर अली असे हल्लेखोराचे नाव होते. काही कळायच्या आतच त्याने तिथून पळ काढला. हल्ल्यात मुन्ना गंभीर जखमी झाले असून त्यांना जवळच्या इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.

ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार मुन्ना हे जिल्ह्याच्या कार्यकारीणीचे माजी सदस्य आहेत तसेचा माजी मंत्री आणि आमदार सुरेंद्र सिंह यांचे निकटवर्तीय मानेल जातात. तसेच मुन्ना आणि हल्लेखोरामध्ये पूर्वीपासून वाद होता.  पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू आहे.