कारवाई करणाऱ्या पोलिसाला धक्काबुक्की

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मास्क परिधान न करणाऱ्या दोघांविरूद्ध कारवाई केल्यामुळे त्यांनी एका पोलिस अमंलदाराला धक्काबुक्की केल्याची घटना कात्रज भागात घडली. याप्रकरणी गणेश काळे यांनी दोघांविरोधात भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

काळे कात्रज भागात गस्त घालत होते. त्यावेळी एका चहा विक्री करणाऱ्या टपरीवर दोघेजण विनामास्क थांबले होते. काळे यांनी त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यास सुरुवात केली. त्यावेळी आरोपींनी काळे यांना धक्काबुक्की केली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस तपास करीत आहेत.