कोरोना संदिग्ध तरुणाची आत्महत्या, रिपोर्ट निघाले निगेटिव्ह

828
file photo

कोरोनामुळे आतापर्यंत देशात 17 जणांचा मृत्यू झाला आहे. तर दिल्लीत कोरोना संदिग्ध तरुणाने आत्महत्या केली आहे. त्याचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.

18 मार्च रोजी दिल्लीच्या सफदरजंग इस्पितळातून सातव्या मजल्यावरून उडी मारून एका तरुणाने आत्महत्या केली. तरुणाचे नाव चरणजीत सिंह असून त्याचे वय 23 होते. चरणजीत सिडनीहून दिल्लीत आला होता. त्याचे कोरोनाचे लक्षणे आढळल्याने त्याला सफरदरजं इस्पितळात दाखल करण्यात आले होते.  त्याला डोकेदुखीचा त्रास होता. कोरोनाची लक्षणे आढळल्यानंतर त्याला सफदरजंगच्या इस्पितळात पाठवण्यात आले. चरणजीत मूळचा पंजाबचा रहिवासी असून तो गेली एक वर्ष सिडनीत राहत होता.

कोरोनाला घाबरून त्याने आत्महत्या केली, त्यात त्याचा मृत्यू झाला. परंतु त्याची कोरोनाची टेस्ट निगेटिव्ह निघाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या