
सामना प्रतिनिधी । रत्नागिरी
चिपळूण तालुक्यातील खांडोत्री पन्हळी येथील तलावात 18 वर्षीय युवकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. खांडोत्री देऊळवाडी येथील रोहित सोमा कोदारे (वय 18) असे या तरुणाचे नाव आहे. या युवकाचा खांडोत्री पन्हळी येथील इम्रान खतीब यांच्या तलावात बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना शनिवारी घडली. रोहितला तलावातून बाहेर काढून उपचारासाठी वहाळ येथील दवाखान्यात नेले असता त्याला मृत घोषित करण्यात आले. या घटनेचा तपास सावर्डे पोलिस करत आहेत.
































































