‘गोल्डन टेम्पल मेल’वर दगडफेक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईहून अमृतसरला जाणाऱ्या गोल्डन टेंपल मेलवर शनिवारी रात्री अज्ञात तरुणांनी दगडफेक केली. काच डबल लेअरच्यी असल्यामुळे काचेचा बाहेरचा स्तर फुटला तर आतला सुरक्षित राहिला. संपूर्ण काच फुटली असती तर प्रवाशांना गंभीर दुखापत झाली असती. या घटनेने प्रवाशांमध्ये घबराट पसरली. अमृतसर पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू केला.