यूसूफ पठाण क्रिकेटमधून निवृत्त

धडाकेबाज फलंदाज अष्टपैलू युसूफ पठाणने  शुक्रवारी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. युसूफने देशासाठी 57 वन डे आणि 22 टी-20 सामने खेळले असून तो तीन वेळा आयपीएल चॅम्पियन ठरलेल्या संघाचा तो सदस्यही होता.

38 वर्षीय युसूफ पठाणने 2007 च्या पहिल्या टी-20 वर्ल्ड कपच्या फायनलच्या सामन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. जायबंदी झालेल्या वीरेंद्र सेहवागच्या जागेवर त्याला संधी मिळाली होती. राजस्थान रॉयल्स (2008) व कोलकाता नाईट रायडर्स (2012 व 2014) संघांकडून खेळताना त्याने आयपीएलचा करंडक उंचावलाय.

‘कुटुंबीय, मित्र, चाहते, संघसहकारी, प्रशिक्षक आणि देशाचा आभारी आहे. तुम्हा सर्वांकडून मला भरभरून प्रेम आणि समर्थन मिळाले.’

युसूफ पठाण

आपली प्रतिक्रिया द्या