युवा दौड: रत्नागिरीकर धावले

36

सामना प्रतिनिधी । रत्नागिरी

महाराष्ट्र राज्य पोलीस रेझींग डे निमित्ताने पोलीस व जनता यांचेतील संबंध वृध्दींगत होण्याकरीता रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाचे वतीने जिल्हयामध्ये विविध कार्यक्रमांचे तसेच उपक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे.

शनिवारी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती तसेच राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे व अपर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली युवा दौड कार्यक्रम आयोजित करण्यात आला. पोलीस कवायत मैदान (पोलीस मुख्यालय) ते भाट्ये बीच अशी दौड आयोजित करण्यात आली होती. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, कोषागार अधिकारी उमेश मगदुम, पोलीस निरीक्षक शिरीष सासने, अयुब खान, रामदास पालशेतकर, राखीव पोलीस, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या दौडला नागरीकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला.

आपली प्रतिक्रिया द्या