
सामना प्रतिनिधी । मेहकर (जि. बुलढाणा)
युवासेना प्रमुख तथा शिवसेना नेते आदीत्य ठाकरे यांच्या मेहकर येथील १९ नोव्हेंबरच्या सभेची जोरदार तयारी सुरू झाली आहे. या सभेला युवकांनी मोठ्या संख्येने हजर रहावे, असे आवाहन युवा सेना कोअर कमेटी सदस्य सिध्देश कदम यांनी केले आहे.
दि. १९ नोव्हेंबरला शिवसेना नेते आदीत्य ठाकरे यांची मेहकर येथे सभा होत आहे. त्यानिमित्त दि. ६ रोजी स्थानिक महाराष्ट्र अर्बन सभागृहात आढावा बैठक आयोजीत करण्यात आली होती. या बैठकीसाठी युवा सेना कोअर कमेटी सदस्य सिध्देश कदम व पवन जाधव (मुंबई) हे दोघे आले होते. यावेळी जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत, शिवसेना आमदार संजय रायमुलकर, जिल्हाप्रमुख शांताराम दाणे, सहसंपर्कप्रमुख भास्करराव मोरे, सभापती माधवराव जाधव, युवासेना जिल्हा युवा अधिकारी ऋषी जाधव, जिल्हा प्रमुख संतोष माने (संभाजीनगर), विठ्ठल सराफ (अकोला), राजेन्द्र जवंजाळ, किशोर भोसले, माजी जिल्हाप्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर, उपजिल्हाप्रमुख राजेन्द्र गाडेकर, बाबुराव मोरे, संजय गायकवाड, मिथुल व्यास, लखन गाडेकर, नंदु कराडे, तालुकाप्रमुख सुरेश वाळूकर, गजानन भोकरे सह शिवसेना व युवा सेना पदाधिकारी हजर होते.
आपल्या भाषणात सिध्देश कदम पुढे म्हणाले की, खरोखरच बुलडाणा जिल्हा हा शिवसेनेचा गड आहे. येथील संघटन कौशल्य चांगले आहे. आम्ही कोकणात जे बघतो तसेच येथे दिसत आहे. युवा सेना राज्यातील १५ जिल्ह्यात पाच हजार शेतकऱ्यांना मदतीचा हात देत आहे. येथेही आपण २५० शेतकऱ्यांना मदत करीत आहोत. या कार्यक्रमाला जिल्ह्यातून मोठ्या संख्येने हजर राहण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी आ. संजय रायमुलकर, पवन जाधव, संजय गायकवाड, नरेंन्द्र खेडेकर यांची भाषणे झाली. सूत्र संचालन उपनगराध्यक्ष जयचंद बाठीया तर आभार युवा सेना जिल्हा युवा अधिकारी ऋषी जाधव यांनी मानले.
































































