दक्षिण आफ्रिकेची जोजिबिनी मिस युनिव्हर्स

365

दक्षिण आफ्रिकेच्या जोजिबिनी तुंजी या 26 वर्षीय तरुणीने रविवारी रात्री 68व्या ‘मिस युनिव्हर्स’ स्पर्धेत आपले नाव कोरत आपल्या देशाचे नाव उज्ज्वल केले. येथे पार पडलेल्या या सोहळ्यात हिंदुस्थानसह तब्बल 90 देशांमधील सौंदर्यवतींनी भाग घेतला होता. हिंदुस्थानची वर्तिका सिंह पहिल्या वीस स्पर्धकांमध्ये होती. पण तिला हा खिताब मिळवता आला नाही. पोर्ते रिको देशाची मेडिसन एण्डरसन दुसऱया, तर मैक्सिकोची ऍशले अल्किद्रेज ही तिसऱया स्थानावर राहिली.

सौंदर्याचा अर्थ काय?
अंतिम फेरीत स्पर्धकांनी अनेक प्रश्नांना आपापल्या पद्धतीने उत्तरे दिली. त्यातूनच जोजिबिनी तुंजी हिला विजयी घोषित करण्यात आले. ‘सौंदर्याचा अर्थ काय?’ असा प्रश्न तिला विचारला होता तेव्हा ती म्हणाली, ‘रंगामुळे मला माझ्याच देशात सुंदर म्हटले जात नव्हते. पण माझ्या स्वप्नांवर मी लक्ष केंद्रीत केले. हा किताब जिंकून जेव्हा मी परत जाईन तेव्हा माझ्या देशातील तरुण-तरुणींना माझ्याकडे पाहून अभिमान वाटेल.

हिंदुस्थानची वर्तिका पहिल्या 20 मध्ये
‘मिस युनिव्हर्स’ स्पर्धेत हिंदुस्थानचे नेतृत्त्व लखनऊची 26 वर्षीय कर्तिका सिंह हिने केले. ती सार्वजनिक आरोग्य या विषयात द्विपदवीधर असून उत्तर प्रदेशच्या राज्य पोषण मोहिमेची ब्रांड ऍम्बेसडर आहे. वर्तिका हिने जागतिक बँकेत क्कालिटी ऍश्योरेंससाठी तांत्रिक सल्लागार म्हणूनही काम केले आहे. ती 2015मध्ये फेमिना मिस इंडिया होती.

आपली प्रतिक्रिया द्या