
सामना प्रतिनिधी, लातूर
लातूर जिल्हा परिषदेसह सबंध जिल्ह्यात खळबळ उडवणारी कारवाई आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली. 9 लाख 40 हजारापैकी 7 लाख रुपयांची लाच स्वीकारणारा जि.प. समाज कल्याण अधिकारी यांचा मध्यस्थ संस्था चालक पकडला. दोघांवर गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरु आहे.
तक्रारदार यांचे अपंग शाळेतील कर्मचाऱ्याचे 47,33,689/- रुपयाचे थकीत वेतनाचे बील काढलेल्या कामाचे बक्षिस म्हणून उमाकांत नरसिंगराव तपशाळे वय 52 वर्षे, अहिल्यादेवी होळकर शिक्षण प्रसारक मंडळ उदगीर संस्थेचे सचिव रा. शेल्लाळ रोड उदगीर जि. लातूर यांनी शिवानंद कृष्णाजी मिनगीरे वय 35 वर्षे, पद जिल्हा समाज कल्याण अधिकारी, वर्ग 1, नेमणूक समाज कल्याण विभाग, जि.प. लातूर यांचे समक्ष एकुण बीलाच्या 20% प्रमाणे 9,40,000/- रुपये लाचेची मागणी करुन तडजोड अंती 7,00,000/-रु. आता व उर्वरीत 2,40,000/- रु. रक्कम नंतर घेण्याचे मान्य केले. सदर लाचेची रक्कम जिल्हा समाजकल्याण अधिकारी मिनगिरे यांनी तपशिळे यांच्याकडे देण्यास सांगितल्याप्रमाणे संजय क्वॉलिटी हॉटेल लातूर येथे रक्कम स्विकारली.लाचेच्या रक्कमेसह ताब्यात घेण्यात आले. उपअधिक्षक माणिक बेद्रे आणि सहकारी यांनी हा सापळा यशस्वी केला.






























































