कोरेगाव-भीमा विजयस्तंभाची अमरावतीमध्ये प्रतिकृती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

कोरेगाव-भीमा येथील ऐतिहासिक विजयस्तंभांची अमरावतीमध्ये प्रतिकृती उभारण्यात येणार आहे. विजयस्तंभाची प्रतिकृती तसेच विपश्यना केंद्र व बुद्धविहार उभारण्यासाठी सुमारे 2 कोटी 90 लाख रुपयांच्या खर्चास आज राज्य सरकारने मान्यता दिली.

कोरेगाव-भीमा येथील ऐतिहासिक विजयस्तंभाला 201 व्या शौर्यदिनानिमित्त अनुयायांनी आज कोरेगाव-भीमा येथे गर्दी केली होती. या दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने अमरावतीमध्ये विजयस्तंभाची प्रतिकृती उभारण्याच्या खर्चाच्या प्रस्तावास मान्यता दिली आहे. अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील मान्यवर व्यक्तींचे स्मारक बांधणे तसेच सांस्कृतिक व ऐतिहासिदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या स्थळांचा विकास करण्याच्या योजनेअंतर्गत अमरावतीमध्ये विजयस्तंभाची प्रतिकृती उभारण्यात येणार आहे.