
मुंबईत आज दिवसभरात 10 रुग्ण सापडले तर 8 जण कोरोनामुक्त झाले. 10 रुग्णांपैकी एकाही रुग्णाला कोरोनाची कोणतीही लक्षणे नव्हती. गंभीर आणि अतिगंभीर रुग्णांच्या संख्याही घटली असून गेल्या काही दिवसांत कोरोनामुळे एकही मृत्यू झालेला नाही. सक्रिय रुग्णांचीही संख्या कमी झाली असून ती 69 वर पोहोचली आहे. दरम्यान, मुंबई महापालिकेने यशस्वीपणे राबवलेल्या लसीकरण मोहिमेमुळे कोरोना नियंत्रणात आहे. मात्र मुंबईकरांनी गर्दीच्या ठिकाणी खबरदारीचा उपाय म्हणून मास्क वापरावा, असे आवाहन मुंबई महापालिकेने केले आहे.



























































