
जनतेचा पैसा जाहिरातींवर मोठय़ा प्रमाणात खर्च करण्यात मिंधे सरकारचा हात कुणीही धरणार नाही. शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या माध्यमातून ते दिसून आले. आता निवडणुकीच्या तोंडावर सरकारी जाहिरातींवर सुमारे 10 कोटींची उधळपट्टी केली जाणार आहे. या खर्चाला नुकतीच मंजुरी देण्यात आली आहे.
सरकारच्या योजनांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याच्या निमित्ताने ही उधळपट्टी केली जाणार आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या लोकल गाडय़ांमधील एलईडी स्क्रीन्स तसेच प्लॅटफॉर्मवरील एलईडी स्क्रीन्सवर मिंधे सरकारच्या जाहिराती केल्या जाणार आहेत. त्यावर 7 कोटी 94 लाख 16 हजार 136 रुपये इतका खर्च केला जाणार आहे.
मिंधे सरकारने घरोघरी पोहोचणारी एमएसईबीची वीज बिले आणि गॅस बिलांवरूनही जाहिराती करण्याचा घाट घातला आहे. त्यासाठी 1 कोटी 99 लाख 93 हजार 417 रुपये खर्चाला मंजुरी देण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभागाने त्यासंदर्भातील शासन निर्णय नुकताच जारी केला.


























































