
सुनील उंबरे, पंढरपूर
आषाढी एकादशीसाठी पंढरपूर देवस्थान समितीमध्ये सध्या १० लाख लाडू तयार करण्याची गडबड सुरू आहे. यंदा आषाढी एकादशीसाठी पंढरपुरात १५ लाख भावित येतील अशी अपेक्षा आहे. प्रत्येक भाविकाला प्रसाद मिळावा यासाठी इतक्या मोठ्या प्रमाणावर लाडू वळण्याचे काम सुरू झाले आहे. या लाडूंसाठी ३०० क्विंटल साखर, ३०० क्विंटल हरबरा डाळ, २ हजार लिटर तेल हे साहित्य वापरलं जात आहे. साठ महिला कर्मचारी तीन शिप्ट मध्ये लाडू वळण्याचे आणि पॅकींगचे काम करीत आहेत.
मंदिर समितीच्या भटारखान्यात सध्या दररोज २५ हजार लाडू करण्याचे काम सुरु आहे. वारीच्या मुख्यसोहळ्यादरम्यान ७ ते ८ लाख लाडूंची विक्री होईल असा अंदाज आहे. जे लाडू बनवण्याचे काम सध्या सुरू आहे, ते बुंदीचे लाडू आहेत. अनेक भाविकांचा एकादशीला उपास असल्याने ते या लाडूचा प्रसाद घेत नाहीत. अशा भाविकांसाठी दीड लाख राजगिरा लाडू तयार करण्याचेही काम सुरू झाले आहे.

























































