
प्रसिद्ध नाटककार विद्याधर गोखले यांच्या जन्मशताब्दीनिमित्ताने राज्यभरातील विविध शहरांत विविध संकल्पनांवर आधारित नाटय़संगीताचे कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. विद्याधर गोखले प्रतिष्ठानच्या वतीने 25 डिसेंबर रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, शिवाजी पार्क येथे सायंकाळी 5 वाजता ‘पंडितराज विद्याधर’ हा नाटय़संगीताचा 100 वा कार्यक्रम सादर होणार आहे.
महाराष्ट्रातील तरुण कलाकारांचा हा नाटय़संगीत कार्यक्रम आहे. अनेक ठिकाणी त्याचे सादरीकरण होत आहे. हा कार्यक्रम विनामूल्य असून युवा कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी उपस्थित रहावे, असे आवाहन प्रतिष्ठानच्या अध्यक्षा शुभदा दादरकर यांनी केले आहे.

























































