
सामना प्रतिनिधी । चंद्रपूर
वरोरा एसडीपीओ पथकाच्या पोलिसांनी मौजा मानोरा फाटा भद्रावती येथे गस्तीदरम्यान दारू तस्करी होण्याची माहिती मिळाली. टाटा एस गाडी क्रमांक एम एच 34 ए बी 11 81 नागपुर वरून चंद्रपूरला जात असलेल्या भाजी गाडी अडवून चौकशी केली असता मोठ्या प्रमाणात दारू साठा आढळून आला. व त्याचप्रमाणे या गाडीच्या पुढे पायलेटीग म्हणून वापरण्यात येणारी चेवरोलेट कार यामधील पाच आरोपी गाडी क्रमांक MH 31CN 07775 अडवून झडती घेतली असता भ्रमणध्वनीवरून दोन्ही गाडींना संपर्क साधत होते. यामध्ये टाटा पिकप भाजीच्या गाडीत विदेशी दारूच्या 70 पेट्या आढळून आल्या.
नागपुर वरून चंद्रपूरकडे मोठ्या प्रमाणात सकाळी भाजी पाला चंद्रपूर येथे पोहोचविला जातो, याचाच फायदा घेत दारू तस्करांनी आपली अनोखी शक्कल लढवत या भाजी गाड्यांचा उपयोग दारू तस्करीसाठी मोठ्या प्रमाणात करत होते. मागील काही दिवसांपासून याच प्रमाणे वाढलेले असून यावर नियंत्रण करण्यासाठी पोलिसांनी रात्रभर जागून वरोरा पथकाने पकडले असून यामध्ये 11 आरोपींना एकाचवेळेस पोलीस कोठडी दाखवली आहे. एसडीपीओ प्रताप पवार यांच्या मार्गदर्शनात धिरज महाजन प्रदीप पाटील अनिल बैठा निखिल कौरासे, संतोष निषाद, सचिन थेरे यांनी कारवाई केली सदर गुन्हा भद्रावती पोलीस स्टेशन येथे दाखल असून पुढील तपास भद्रावती पोलिस करीत आहे.































































