12 पूल बंद, 9 पूल पाडणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन,मुंबई

पालिकेने केलेल्या स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये  धोकादायक आढळलेल्या 29 पुलांपैकी आठ पूल पाडण्यात आले असून 12 पूल वापरासाठी बंद करण्यात आले आहेत. तर इतर शिल्लक9 पूल लवकरच तोडले जाणार आहेत. या कामामुळे नागरिकांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीने करण्यात येणाऱ्या या कामासाठी मुंबईकरांनी पालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.

पालिकेच्या अखत्यारीत एकूण 344 पूल आहेत. यातील 304 पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट प्रगतिपथावर आहे. यामध्ये आतापर्यंत धोकादायक आढळलेल्या 29 पुलांमधील 8अतिधोकादायक पूल याआधीच पाडण्यात आले आहेत. तर 12 धोकादायक पूल वापरासाठी बंद करण्यात आले असून शिल्लक 9 अतिधोकादायक पूल लवकच पाडण्यात येणार आहेत. यामध्ये पादचारी पुलांसह वाहतूक पुलांचाही समावेश आहे. धोकादायक पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार असल्यामुळे नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्याचे काम पालिकेकडून सुरू असल्याचे पूल खात्याचे प्रमुख अभियंता संजय दराडे यांनी सांगितले असून सुरक्षेसाठी मुंबईकरांनी पालिकेला सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी केले आहे.

असे होणार काम

एकूण धोकादायक आढळलेल्या 29 पुलांपैकी तीन पुलांचे कार्यादेश याआधीच देण्यात आले असून उर्वरित सात पुलांबाबत स्थायी समितीकडे ‘डीएल’ सादर करण्यात आले असून पाच पुलांबाबत निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.