
सामना ऑनलाईन, पुणे
चांगल्या कुटुंबातील मुलाने 3 वर्षांच्या मुलाचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात घडला आहे. सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या प्रकाराबद्दल पीडित मुलाच्या कुटुंबीयांनी तक्रार दाखल केली आहे. धक्कादायक बाब ही आहे की पहिल्यांदा जेव्हा आरोपीने पीडित मुलाचा लैंगिक छळ केला होता तेव्हा त्याने घरच्यांना सगळा प्रकार सांगितला होता. पीडित मुलाच्या कुटुंबीयांनी आरोपीच्या कुटुंबीयांची भेट घेऊन या प्रकाराबद्दल त्यांना सांगितलं होतं. आरोपीच्या कुटुंबीयांनी असा प्रकार पुन्हा होणार नाही असं आश्वासन दिल्यानंतरही आरोपीनी पीडित मुलाचे लैंगिक शोषण करणे सुरू ठेवले होतं.
पीडीत आणि आरोपी हे एकाच सोसायटीमध्ये राहतात. 12 वर्षांची तीन मुलांचा एक ग्रुप असून त्यांच्यासोबत हा चिमुरडा खेळायला जात होता. त्याला गार्डनमध्ये नेतो असं सांगून आरोपी त्याला घेऊन गेला आणि त्याच्यावर अत्याचार केला. हा प्रकार पीडित मुलाच्या घरच्यांकडून आरोपी मुलाच्या घरच्यांना कळवण्यात आला होता. त्यांनी पोलिसांत तक्रार न करण्याची विनंती केल्याने पीडित मुलाच्या कुटुंबीयांनी तक्रार केली नव्हती. मात्र त्यानंतरही या मुलाने पीडित मुलावर अत्याचार करणं सुरू ठेवलं होतं. आरोपीच्या मित्राने हे बघून पीडित मुलाच्या घरच्यांना कळवलं ज्यामुळे त्याच्या पालकांनी तत्काळ पोलिसांत तक्रार नोंदवली. आरोपी मुलाविरूद्ध अनैसर्गिक संभोग आणि पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

































































