कचरा वेचण्यास आला, कारमध्ये बसला अन् गुदमरून मेला, नागपूरची दुर्दैवी घटना

140

सामना प्रतिनिधी । नागपूर

उन्हाचा त्रास होत असल्याने रस्त्याच्या बाजूला बंद अवस्थेत असलेल्या कारमध्ये जाऊन बसलेल्या मुलाचा (12) कारचे दरवाजे लॉक झाल्याने गुदमरून मृत्यू झाला. तन्नेश बल्लाळ असे त्याचे नाव आहे. अकोल्यातील आलेवाडी गावात मंगळवारी दुपारी ही घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, तानेश हा आजी आणि मावशीसोबत कचरा वेचण्यासाठी आलेवाडीमध्ये आला होता. यावेळी काटेरी झुडपात उभ्या असलेल्या जुनाट कारमध्ये तो बसला. याचवेळी कारचे दरवाजे अचानक बंद झाले. या घटनेत बालकाचा गुदमरून मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. आजी आणि मावशी कचरा वेचत बसल्याने त्यांच्या लक्षात ही घटना आली नसावी. गाडीबद्दल चौकशी केली असता गेल्या 2 वर्षांपासून गाडी बंद अवस्थेत उभी असल्याचे गाडीचे मालक नागेश कराळे यांनी सांगितले. यासंदर्भातील पुढील तपास दहीहंडा पोलीस करीत आहेत

आपली प्रतिक्रिया द्या