गडचिरोलीत आढळला 15 किलोचा भूसुरुंग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । गडचिरोली

धानोरा, तालुक्यात नक्षलविरोधी मोहीम राबवीत असताना बुधवारी केंद्रीय राखीव दलाच्या 113 बटालियनच्या जवानांना गॅरापत्ती-सावरगाव मार्गावरील कांगडी गावाजवळ 15 किलो वजनाची स्फोटके पेरुन ठेवल्याचे आढळून आले. बुधवारी सकाळी सीआरपीएफच्या 113 बटालियनचे जवान नक्षलविरोधी मोहीमेवर निघाले असता कांगडी गावाजवळ आयईडी स्फोटके पेरुन ठेवल्याचे निदर्शनास आले. सीआरपीएफच्या जवानांनी बॉम्बशोधक व नाशक पथकाच्या जवानांना पाचारण करुन ही स्फोटके बाहेर काढण्यात आली.

त्यात जवळपास 15 किलो स्फोटके त्यात आढळून आली. नंतर ती नष्ट करण्यात आली. यामुळे मोठा अनर्थ टळला.113 बटालियनचे कमांडंट एन.शिवशंकरा यांच्या मार्गदर्शनाखाली उपकमांडंट प्रमोद शिरसाट, निरीक्षक श्री.ननैया, पोलिस उपनिरीक्षक के.डी.ढेरे और पोलिस जवानांनी ही कामगिरी बजावली.