देशाच्या प्रगतीसाठी मुस्लिमांनाही दोन मुलांवरच रोखा! राजस्थानच्या माजी मंत्र्यांचं विधान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
gc-kataria

सामना ऑनलाईन । जयपूर

देशाची लोकसंख्या आणि त्यात मुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर मिळणारी सूट यावरून यापूर्वी देखील अनेकदा वादळी चर्चा झाल्या आहेत. मात्र राजस्थानच्या माजी मंत्र्यांनी पुन्हा एकदा विधान करून या विषयाला हवा दिली आहे. मुस्लिमांनाही दोन मुलांवरच रोखा, असं विधान त्यांनी एका सभेत बोलताना केलं आहे.

जर आपल्याला दोन मुलांवर रोखले जाते, तर त्यांना (मुस्लिम) देखील याच नियमांच्या आधारावर दोन मुलांवर रोखले जावे. कारण असेच सुरू राहिले तर देशाची प्रगती कशी होणार?, असा सवाल माजी जी सी कटारिया केला आहे. तसेच यासाठी कायद्यात बदल करण्याची गरज असून त्यासाठी संसदे दोन तृतियांश मताधिक्याची गरज असल्याचेही ते म्हणाले. कटारिया यांच्य या विधानावर राज्य सरकार काय प्रतिक्रिया देते याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.