मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणासाठी अमेरिका तयार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईवरील 2008च्या ‘26/11’ दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड आणि पाकिस्तानी वंशाचा पॅनेडियन उद्योजक तहव्वूर राणाला हिंदुस्थानकडे सोपवण्यासाठी अमेरिकेच्या बायडेन प्रशासनाने सकारात्मक संकेत दिले आहेत. अमेरिकन सरकारचे अॅटर्नी जॉन जे. लुलेजियान यांनी लॉस एंजेलिस जिल्हा न्यायालयात पत्राद्वारे राणाच्या हिंदुस्थानकडील प्रत्यार्पणाला अमेरिकन सरकारचा होकार असल्याचे सांगितले आहे. आता याप्रकरणी पुढील सुनावणी 24 जूनला होणार आहे.