नांदेड, संभाजीनगरपाठोपाठ नागपुरातही मृत्यूचे थैमान, 24 तासांत 25 रुग्ण दगावले

नांदेडच्या शासकीय रुग्णालयात आणि संभाजीनगरातील घाटी रुग्णालयात मृत्यूचे तांडव पाहायला मिळाले. या घटनांपाठोपाठ नागपुरातील शासकीय रुग्णालयातही मृत्यूचे थैमान घातले आहे. इथल्या नागपूर वैद्यकीय महाविद्यालय आणि इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात 24 तासांत 25 रुग्णांचा मृत्यू दगावल्याचे वृत्त आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृत रुग्णांमध्ये 16 रुग्ण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील आणि 9 रुग्ण इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील आहेत. 25 पैकी 12 रुग्णांना अत्यवस्थ अवस्थेत खासगी रुग्णालयातून सरकारी रुग्णालयात हलवण्यात आले होते.