‘तारक मेहता’च्या सोढीचे गूढ वाढले!

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या टीव्ही शोमध्ये रोशन सिंग सोढीची भूमिका साकारणारा अभिनेता गुरचरण सिंग बेपत्ता होऊन आता सहा दिवस उलटले आहेत. परंतु अद्याप त्याचा पत्ता लागलेला नाही. सोढी लवकरच लग्न करणार होता. तसेच तो आर्थिक संकटाशी सामना करत होता, अशा दोन गोष्टी समोर आल्याने हे प्रकरण नेमके काय आहे, याचा तपास पोलीस करत आहेत. वडिलांच्या तक्रारीनंतर दिल्ली पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला असून सोढीचा शोध सुरू आहे. गुरुचरणने 22 एप्रिल रोजी एटीएममधून 7,000 रुपये काढले होते, त्यानंतर त्याचा पह्न बंद झाला. दिल्लीतील पालम येथील घरापासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर त्याचे शेवटचे ठिकाण सापडले, असेही पोलिसांनी सांगितले. पोलिसांना पालम परिसरातून काही सीसीटीव्ही फुटेज मिळाले आहेत, ज्यात अभिनेता बॅग घेऊन रस्ता ओलांडताना दिसत आहे.

बेपत्ता होऊन आठवडा उलटला

गुरुचरण सिंग सोढी 22 एप्रिल रोजी मुंबईहून दिल्लीला रवाना झाला होता, त्यानंतर त्याच्याशी संपर्क होऊ शकला नाही. याप्रकरणी गुरुचरणचे वडील हरगीत सिंग यांनी 25 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजता दिल्लीतील पालम पोलीस स्टेशनमध्ये बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती.