
तौकते चक्रीवादळग्रस्तांच्या मदतीसाठी तयार करण्यात आलेला 250 कोटी रुपयांच्या पॅकेजचा प्रस्ताव उद्या गुरुवारी होणाऱ्या राज्यमंत्री मंडळाच्या बैठकीत मंजुरीसाठी येणार आहे.
तौकते चक्रीवादळाने राज्याच्या किनारपट्टीवरील सात जिल्ह्यांना जोरदार तडाखा दिला आहे. मदतीचा प्रस्ताव उद्या गुरुवारी होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरीसाठी सादर होईल, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.






























































