
गोवा विधानसभेचे निकाल गुरुवारी जाहीर झाले. यंदा गोयंकरांनी निवडून दिलेल्या 40 विधानसभा सदस्यांमध्ये पती-पत्नीच्या तीन जोड्यांचा समावेश आहे. यामध्ये गोव्यातील विद्यमान भाजप सरकारमधील आरोग्यमंत्री विश्वजित राणे आणि त्यांच्या पत्नी दिव्या हे दोघेही निवडून आले आहेत. विश्वजित यांनी वाळपोई विधानसभा मतदारसंघातून आणि त्यांच्या पत्नी देविया यांनी पोरीम विधानसभा मतदारसंघातून पक्षाच्या तिकीटावर विजय मिळवला आहे.
काँग्रेसचे मायकेल लोबो हे त्यांच्या कळंगुट या पारंपारिक विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले, तर त्यांच्या पत्नी डेलिलाह यांनीही काँग्रेसच्या तिकिटावर सिओलिम मतदार संघातून विजय मिळवला. पणजी मतदारसंघातून भाजपचे अतानासिओ मोन्सेरात हे विजयी झाले, तर त्यांच्या पत्नी जेनिफर या तळेगाव मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर विजयी झाल्या आहेत.
तृणमूल काँग्रेसच्या उमेदवार असणाऱ्या कविता कांदोळकर आणि त्यांचे पती किरण यांचा पराभव झाला. या दोघांनीही थिविम आणि अल्डोना मतदारसंघातून निवडणूक लढविली होती. कविता यांना भाजपचे विद्यमान आमदार नीलकांत हर्लणकर आणि किरण यांना काँग्रेसच्या कार्लोस फरेरा यांच्याकडून पराभव पत्करावा लागला.





























































