
अमेरिकेतील डेव्हिड कार्ड, जोशुआ डी. एंग्रिस्ट आणि गुइडो इम्बेन्स या तीन अर्थशास्त्रज्ञांना यंदाचे अर्थशास्त्र क्षेत्रातील नोबेल पारितोषिक जाहीर झाले आहे. डेव्हिड कार्ड यांना श्रम अर्थशास्त्रातील योगदानासाठी, तर एंग्रिस्ट आणि इम्बेन्स या दोघांना नैसर्गिक प्रयोगांतून प्रभावी निष्कर्ष काढल्याबद्दल सन्मानित करण्यात आले आहे.
डेव्हिड कार्ड हे पॅलिपहर्निया बर्कलेमध्ये अर्थशास्त्राचे प्राध्यापक आहेत. नव्वदच्या दशकाच्या सुरुवातीला त्यांनी सखोल अभ्यासातून पारंपरिक ज्ञानाला आव्हान दिले. त्यातून नवीन विश्लेषण आणि अतिरिक्त माहिती समोर आली. तसेच एंग्रिस्ट आणि इम्बेन्स यांनीही नव्वदच्या दशकाच्या मध्यावर नैसर्गिक प्रयोगांतून कारण व परिणाम याबाबत तंतोतंत निष्कर्ष कशा प्रकारे काढले जाऊ शकतात, हे सिद्ध केले. तिन्ही अर्थशास्त्रज्ञांनी अर्थशास्त्रातील अनुभवजन्य कार्याला पूर्णपणे आकार दिला आहे, असे रॉयल स्विडीश अॅपॅडमी ऑफ सायन्सेसने म्हटले आहे.

























































