उत्तर प्रदेशमध्ये वीज कोसळून 30 गायींचा मृत्यू, शवविच्छेदन न करताच पुरले मृतदेह

19
प्रातिनिधीक

सामना ऑनलाईन । लखनौ

उत्तर प्रदेशच्या अयोध्येत वीज कोसळून 30 गायींचा मृत्यू झाला आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे या गायींचे शवविच्छेदन न करताच त्यांना दफन करण्यात आले आहे.

उत्तर प्रदेशमध्ये प्रयागराजमध्ये वीज कोसळून 35 गायींचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असताना अयोध्येत ३० गायींचा मृत्यू झाला आहे.  प्रतापगढमध्येही 6 गायींचा मृत्यू झाला आहे. पावसाच्या पाण्यामुळे गोठ्याचे रुपांतर दलदलीत झाले आणि याच दलदलीत अडकून या 6 गायींचा मृत्यू झाला आहे.  या प्रकरणी मंत्री मोती सिंह यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

एका पशुचिकित्सकाने दिलेल्या माहितीनुसार या गोशाळांमध्ये गायींना खुले सोडले जाते. त्यामुळे त्या पावसात भिजत राहतात. गोशाळेत जमिनीवर लादी न लावल्याने तिथे पाणी साचून दलदल होऊन जाते. ज्या गोशाळेत पत्रे बसवण्यात आले आहेत त्यांचीही अवस्था बिकट आहे. जेव्हा जोरात पाऊस येतो तेव्हा हे पत्रेही उडून जात असल्याचे त्यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या