दुष्काळात देणगीचा सुकाळ, विठुरायाच्या चरणी 4 कोटी 40 लाखाचे दान जमा

46
vitthal-temple-pandharpur

सुनील उंबरे । पंढरपूर

नुकत्याच पार पडलेल्या आषाढीवारीच्या सोहळ्यात श्री विठ्ठल रखुमाईच्या चरणी 4 कोटी 40 लाख रुपयांचे दान जमा झाले आहे. राज्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती असताना देखील गेल्या वर्षीच्या तुलनेने तब्बल दीड कोटी रुपये अधिकचे दान जमा झाले असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी सचिन ढोले यांनी दिली आहे.

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरला आषाढी वारीला विक्रमी गर्दी झाली होती. यावेळी आलेल्या तब्बल 15 लाख भाविकांपैकी 5 लाखाहून अधिक भाविकांनी देवाचे पदस्पर्श दर्शन घेतले. यावेळी विविध माध्यमातून विक्रमी असे 4 कोटी 40 लाख 37 हजार 786 रुपयांचे दान विठुरायाच्या चरणी जमा झाले आहे. दि. 3 जुलै ते 17 जुलै या 15 दिवसात समितीच्या उत्पन्नात भरघोस वाढ झाली आहे. यामध्ये श्री विठ्ठलाच्या पायावर 39 लाख 63 हजार 424 रूपये तर श्री रूक्मिणी मातेच्या पायावर 7 लाख 72 हजार 180 रूपये दान प्राप्त झाले आहे. तसेच देणगी पावती मधून 1 कोटी 84 लाख 54 हजार 91 रूपये, बुंदीलाडू प्रसाद विक्रीमधून 72 लाख 468 हजार 220 रूपये जमा झाले आहेत. नव्याने बांधण्यात आलेले अलिशान भक्त निवास यंदाच्या आषाढीला भाविकांसाठी खुले केले होते. या भक्त निवास मधून 18 लाख 91 हजार 605 रूपये उत्पन्न मिळाले. या सह विविध माध्यमातून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला यंदाच्या वर्षी 4 कोटी 40 लाखाचे उत्पन्न मिळाले आहे. गेल्यावर्षी म्हणजे आषाढी 2018 रोजी समितीला 2 कोटी 90 लाख उत्पन्न मिळाल्याची माहिती सचिन ढोले यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या