चिंताजनक! 24 तासात 46,164 कोरोना रुग्णांची नोंद, 80 टक्के रुग्ण एकट्या केरळमध्ये आढळले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशात गेल्या काही दिवसांत कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचे दिसून आले होते. मात्र गेल्या दोन दिवसात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. गेल्या 24 तासात देशात 46 हजार 164 रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या 56 दिवसातील हे सर्वाधिक रुग्ण आहे. याआधी 1 जुलैला 46 हजार 781 रुग्ण आढळले होते.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासात 34 हजार 242 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला तर 605 रुग्णांचा मृत्यू झाला. आकडेवारीनुसार केरळमधील परिस्थिती गंभीर होत असून बुधवारी नोंद झालेल्या एकूण रुग्णांपैकी जवळपास 80 टक्के रुग्ण एकट्या केरळमध्ये आढळले आहेत. केरळमध्ये गेल्या 24 तासात 31 हजार 445 रुग्ण आढळले असून तिसऱ्या लाटेची ही चाहून असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे.

कोरोना आकडेवारी

एकूण संक्रमण – 3.25 कोटी
एकूण डिस्चार्ज – 3.17 कोटी
एकूण मृत्यू – 4.36 लाख
सक्रिय रुग्ण – 3.27 लाख

राज्यातील रुग्ण वाढ

दरम्यान, महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 5 हजार 31 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. 4 हजार 380 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला तर 216 रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत 62.47 लाख रुग्ण कोरोनामुक्त झाले असून 50 हजार 183 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.