जलीकट्टू महोत्सवात 49 जण जखमी, पाहा थरारक व्हिडीओ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फोटो: पीटीआय

सामना ऑनलाईन । मदुराई

तमिळनाडू येथे बुधवारपासून सुरू झालेल्या जलिकट्टू महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी 49 जण जखमी झाले आहेत. यातील नऊ जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जलिकट्टू महोत्सवावरून प्राणी प्रेमी संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

‘या महोत्सवात जवळपास 500 वळू आणि तितक्याच संख्येने स्पर्धक सहभागी झाले होते. या महोत्सवात 49 जण जखमी झाले आहे’,असे मदुराईचे जिल्हाधिकारी एस. नटराजन यांनी सांगितले. सर्वोच्च न्यायालयानें 2016 ला जलिकट्टू महोत्सवावर बंदी घातली होती. मात्र त्यानंतर तामिळनाडूमध्ये त्यानंतर जनआक्रोश उठला होता.