CCTV – मुंबईत लागणार आणखी 5 हजार 625 सीसीटीव्ही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन,मुंबई

मुंबई शहरात आणखी पाच हजार 625 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. शहरात आतापर्यंत  1 हजार 510 ठिकाणी चार हजार 717 सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. त्यात आता आणखी सीसीटीव्हींची भर पडणार असून यासाठी 323 कोटी 23 लाख रुपयांच्या खर्चास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. कॅमेरे बसविण्याचे काम एल ऍण्ड टी कंपनीकडून करण्यात येणार आहे.