Corona – हवाई दल आणि डॉक्टरांच्या मदतीने इराण मधून 58 हिंदुस्थानी असे पोहोचले मायदेशी

802

इराणच्या तेहरान मध्ये अडकून पडलेल्या हिंदुस्थानी नागरिकांचा 58 जणांचा पहिला गट डॉक्टर आणि हवाई दलाच्या ICF C-17 ग्लोबमास्टर विमानाने हिंदुस्थानात दाखल झाला आहे. गाझियाबाद जवळ एका स्वतंत्र ठिकाणी यांना ठेवण्यात येणार आहे. अत्यंत कठीण परिस्थितीत हे कार्य केल्याबद्दल डॉक्टर आणि हवाई दलाचे कौतुक करण्यात येत आहे.

या विमानातून 25 पुरुष, 31 महिला आणि 2 मुलं आणण्यात आली आहेत. तसेच 529 जणांचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी आणण्यात आले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या