
आई-वडील मोलमजूरीसाठी गेल्याचा गैरफायदा उचलून 60 वर्षीय नराधमाने 21 वर्षीय गतिमंद मुलीवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार लातूरमधील लक्कड जवळगा येथे घडला. या प्रकरणी पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून शिरुर अनंतपाळ पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. मुरलीधर माणिक माढे असे आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
लक्कड जवळगा येथील शेतमजूर दाम्पत्य नेहमीप्रमाणे मजूरीवर गेले होते. दुपारच्या सुमारास घरी कोणी नसल्याचा फायदा घेत सेवानिवृत्त पाटकर मुरलीधर याने गतिमंद मुलीवर अत्याचार केला. तरुणीने आरडाओरडा केल्याने कुटुंबातील व्यक्ती धावत आल्याने हा प्रकार उघडकीस आला. हा प्रकार पीडितेच्या आईला समजल्यानंतर त्यांनी तडक पोलीस ठाणे गाठले आणि आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. या प्रकरणी आरोपीविरोधात कलम 376, 376(2),(एल), 376(2)(जे), 354 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी आरोपीच्या मुक्या आवळल्या.


























































