
सामना ऑनलाईन, चेन्नई
सर्वोच्च न्यायालयाने या वर्षापासून दिवाळीमध्ये ठराविक कालमर्यादेत फटाके वाजवण्यास परवानगी दिली होती. तमिळनाडूमध्ये राज्य सरकारने संध्याकाळी सात ते आठ या वेळेनंतर किंवा वेळेआधी फटाके वाजवणाऱ्यावर कठोर कारवाई करायला सुरूवात केली आहे. तमिळनाडीमध्ये 650 जणांना अटक करण्यात आली आहे तर 2100 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मंगळवारी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत ६ वाजायच्या आधी फटाके फोडणाऱ्यांविरोधात किरकोळ प्रमाणात गुन्हे दाखल झाले होते मात्र रात्री 12 पर्यंत ही संख्या अत्यंत झपाट्याने वाढली आहे. चेन्नई शहरात सर्वाधिक म्हणजे 344 गुन्हे नोंदवण्यात आले आहे. कोईंबतूरमध्ये 184 तर तिरूनेलवेलीमध्ये 135 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
Delhi Police has recovered a total of 242.6 Kgs of crackers being sold illegally in Dwarka area in three different cases. Two people arrested pic.twitter.com/wW4o1aZxYL
— ANI (@ANI) November 7, 2018
दिल्लीमध्ये पोलिसांनी परवाना नसतानाही फटाके विक्री करणाऱ्यांविरूद्ध कारवाई सुरू केली आहे. बुधवारी पोलिसांनी बेकायदेशीररित्या फटाके विकणाऱ्या दोन जणांना अटक केली असून त्यांच्याकडून 242 किलो फटाके जप्त केले आहेत.
























































