पॉर्न फिल्म पाहून ५ मुलांचा ८ वर्षांच्या मुलीवर बलात्कार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन,डेहरादून

९ ते १४ वर्ष वयोगटातील ५ मुलांनी त्यांच्याच परिसरात राहणाऱ्या ८ वर्षांच्या मुलीवर सामूहीक बलात्कार केला आहे. मोबाईलवर पॉर्न फिल्म पाहिल्यानंतर या मुलांनी बलात्कार केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे. या मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे. डेहरादूनमधील शाहासपूर भागात गेल्या शुक्रवारी ही घटना घडली आहे. या मुलांना पिडीत मुलगी ही ठराविक वेळेत एकटी असते हे माहिती होतं. या मुलीला त्यांनी आमीष दाखवत मित्राच्या घरी बोलावलं आणि आळीपाळीने तिच्यावर बलात्कार केला. पोलिसांनी ज्या मोबाईलवर मुलांनी पॉर्न फिल्म पाहिली होती, तो मोबाईलही पुरावा म्हणून ताब्यात घेतला आहे.