8 वर्षांच्या मुलीला साडे सहा कोटींची नुकसान भरपाई, McDonald ला दणका

8 वर्षांच्या मुलीला फ्लोरिडातील न्यायालयाने 8 लाख डॉलर्सची म्हणजेच 6 कोटी 56 लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. 4 वर्षांपूर्वी मॅकडोनाल्डमध्ये घेतलेला गरमा गरम चिकन नगेट या मुलीच्या पायावर पडला होता. कारमध्ये बसून बॉक्स उघडताना हा नगेट तिय्चाय पायावर पडल्याने तिला भाजले होते. यामुळे तिच्या पालकांनी मॅकडोनाल्ड आणि फ्रँचायझी धारकाराला कोर्टात खेचले होते. मुलीच्या पालकांनी 15 दशलक्ष डॉलर्स नुकसान भरपाईची मागणी केली होती.

ऑलिव्हिया काराबालो असं या मुलीचं नाव असून तिच्या पालकांनी दाखल केलेला खटला ब्रावार्ड कंट्री न्यायालयात चालवण्यात आला होता. मॅकडोनाल्ड आणि त्यांची फ्लोरिडा फ्रँचायझीविरोधात हा खटला दाखल करण्यात आला होता. मुलीच्या पालकांचे म्हणणे होते की चिकन नगेट हे खूप गरम होते. बॉक्समधलं एक नगेट पायावर पडल्यानंतर या मुलीला भाजलं होतं आणि जखमही झाली होती. यामुळे मुलीच्या पालकांनी 2019 च्या ऑगस्ट महिन्यात खटला दाखल केला होता. मॅकडोनाल्ड आणि फ्रँचायझीने ग्राहकांना खाद्यपदार्थ गरम आहे, काळजीपूर्वक उघडा आणि खा असं सांगणं गरजेचं होतं असं मुलीच्या पालकांचं म्हणणं होतं. कोर्टाने पालकांचे म्हणणे योग्य आहे असं म्हणत ऑलिव्हिया काराबालो हिला नुकसान भरपाई मिळणं आवश्यक असल्याचं म्हटलं आहे.