
मालाड येथील इनऑर्बिट मॉलने शहरातील उत्साही धावपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी ‘हॅपीनेस रन’चे आयोजन केले आहे. येत्या 9 एप्रिलला होणाऱया या शर्यतीत 5 आणि 10 किमी अंतराच्या शर्यती आयोजित केल्या आहेत. 31 मार्चपर्यंत नावे नोंदविणाऱया धावपटूंना फीमध्ये सवलत दिली जाणार आहे. ही 10 किमी अंतराची हॅपीनेस रन पहाटे 5.45 ला सुरू होईल तर 5 किमीची सकाळी 6.45 वाजता. या स्पर्धेतील विजेत्या प्रमाणपत्रासह पदके, रोख पुरस्कार तसेच भेटवस्तूही दिल्या जाणार आहेत. हॅपीनेस रनमध्ये धावणारे धावपटू सलाम बॉम्बे फाऊंडेशनच्या अ चाइल्ड इन स्कूल पॅज अ फ्युचर (शाळेतील मुलांचे भविष्य असते) अशा उपक्रमाला पाठिंबा देणार आहेत.
.





























































