राष्ट्रीय धावपटू ते एमपीएससी, आई-वडीलांच्या कष्टाला कोकणकन्येचा सलाम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । रत्नागिरी

मोलमजुरी करणारे आई-वडीलांच्या कष्टाला रिझवाना हिने एमपीएसीच्या पोलिस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेत राज्यात २२ वा क्रमांक पटकावत यशाची सलामी दिली आहे. गरीब कुटूंबात जन्मलेल्या रिझवाना ककेरी हिचा राष्ट्रीय धावपटू ते एमपीएसी परीक्षा असा खडतर प्रवास आहे.

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत खडतर प्रवासातून रत्नागिरीची रिजवाना लालसाब ककेरी हिची एमपीएससीच्या माध्यमातून पोलीस उपनिरीक्षक पदासाठी निवड झाली आहे. पोलीस उपनिरीक्षक होणारी रिजवाना ही रत्नागिरीतील पहिली महिला ठरली आहे. तिच्या या दैदिप्यमान यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.

रिजवाना लालसाब ककेरी येथील अल्ट्राटेक कंपनीजवळ असणाऱ्या औद्योगिक वसाहतीत राहते. मुळात राष्ट्रीय धावपटू असणाऱ्या रिजवानाचा प्रवास सर्वांसाठी प्रेरणादायी ठरला आहे. शालेय शिक्षण घेताना तिच्या घरची परिस्थिती अत्यंत बेताची होती.

वडिल एका ठेकेदारांकडे त्यावेळी कामाला होते, मात्र त्यानंतर अनेक अशा अडचणी निर्माण झाल्या की, तिच्या वडिलांना घरीच राहावे लागले. मग रिजवानाचे आई वडिल मजूरीचे काम करू लागले. त्यानंतर त्यांनी एमआयडीसीत जागा घेवून एक छोटासा व्यवसाय सुरू केला होता. गरीबीवर मात करत रिझवाना हिने मिळवलेल्या यशाबददल तिचे कौतुक होत आहे.