राष्ट्रीय लोकअदालतीत 318 प्रकरणे निकली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्व न्यायालयात शनिवारी झालेल्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये प्रलंबित व दाखलपूर्व अशा 3793 प्रकरणांपैकी 318 प्रकरणे तडजोडीने मिटविण्यात आली आहेत. तर यातून 2 कोटी 22 लाख 96 हजार 511 रूपये वसूल करण्यात आले आहेत. अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव अतुल उबाळे यांनी दिली.

सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा न्यायालयासह तालुका न्यायलयांमधून ही लोकअदालत शनिवारी पार पडली. यात न्यायालयात प्रलंबित 646 व दाखलपूर्व 3151 अशी 3793 प्रकरणी तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती. यात प्रलंबित 645 प्रकरणांपैकी 103 प्रकरणे तडजोडीने मिटविण्यात आली आहेत तर यातून 1 कोटी 67 हजार 91 हजार 451 रूपये वसूल करण्यात आले आहेत. तसेच दाखलपूर्व 3151प्रकरणांपैकी 215 प्रकरणांमध्ये समजोता झाला असून यातून 55 लाख 5 हजार 60 रूपये वसूल करण्यात आले आहेत. तर एकूण 318 प्रकरणे तडजोडीने मिटविण्यात आली असून यातून 2 कोटी 22 लाख 96 हजार 511 रूपये वसूल करण्यात आले आहेत.

सिंधुदुर्गनगरी येथे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस डी जगमलानी, जिल्हा न्यायाधीश 1 व अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी आर कदम व् मुख्य न्यायदंडाधिकारी. वर्षाराणी पत्रावळे यांच्या अध्यक्षतेखालील तिन मंडळांमधून ही लोकअदालत घेण्यात आली.