
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
संपूर्ण देशात सध्या परीक्षेचे वातावरण आहे. परीक्षेला जाण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी विद्यार्थ्यांना काही टिप्स देत आहेत. दिल्लीमध्ये त्यासाठी खास परीक्षापे चर्चा या कार्यक्रमाचे आयोजनही केले आहे. या कार्यक्रमात एका महिलेने आपल्या मुलाच्या ऑनलाईन गेमच्या व्यसनाचा पाढा वाचून दाखवला.
माझा मुलगा पूर्वी अभ्यासात चांगला होता. परीक्षेतही तो चांगले गुण मिळवत असे परंतु गेल्या काही दिवसांत तो ऑनलाईन गेम्सच्या मागे वेडा झाल्याचे महिलेने सांगितले. यावर आपण काहीतरी उपाय सांगा अशी गळही या महिलेने मोदींना घातली.
यावर तुमचा मुलगा पबजी खेळतो का असे मोदींनीं विचारले आणि सर्व विद्यार्थ्यांमध्ये एक मोठा हशा पिकला. विद्यार्थी आणि तरुणांमध्ये सध्या पबजी या खेळाचे प्रचंड वेड आहे. तरुण तासनतास पबजी खेळत असतात. याची कल्पना पंतप्रधान मोदींनाही असल्याने विद्यार्थ्यांनी आश्चर्य व्यक्त केले.
#WATCH:PM replies when a mother asks what must she do as her son, a Class-IX student is distracted by online games “Ye PUBG wala hai kya? Ye samasya bhi hai, samadhaan bhi hai, hum chahe hamare bachhe tech se door chale jayen, fr toh vo ek prakar se piche jana shuru ho jaenge” pic.twitter.com/uDjqVd4RZa
— ANI (@ANI) January 29, 2019
या प्रश्नावर मोदींनी उत्तर दिले की, “तुमचे प्रश्नच तुमचे उत्तर आहे. तंत्रज्ञान हे आधुनिक काळात महत्त्वाचे आहे. मुलांच्या हातात मोबाईल आहे त्याचा अर्थ ते नवीन तंत्रज्ञान शिकत आहेत. तंत्रज्ञानामुळे आपले सामर्थ्य वाढले पाहिजे, ते कमी होता कामा नये.” म्हणून तंत्रज्ञानाला सकारात्मक घेण्याची गरज असल्याचे मोदींनी म्हटले आहे.

























































