Brahmastra रणबीर-आलियाच्या ‘ब्रह्मास्त्र’चे मोशन पोस्टर लॉन्च, ‘बाहुबली’ची उमटली छाप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या आगामी बहुचर्चीत ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटाचे मोशन पोस्टर लॉन्च करण्यात आले आहे.  मोशन पोस्टरमध्ये ज्या पद्धतीने संगीतत आणि इफेक्टचा वापर करण्यात आला आहे, त्याद्वारे तुम्हाला सुपर हिट ‘बाहुबली’ या चित्रपटाची आठवण आल्याशिवाय राहणार नाही.


View this post on Instagram

Saare astron ka devta – #Brahmastra . . The official movie logo is out now!! Releasing this #Christmas.

A post shared by Alia (@aliaabhatt) on

मोशन पोस्टरमध्ये रणबीर कपूर, अमिताभ बच्चन आणि आलिया भट्ट साकारत असलेल्या व्यक्तिरेखांचे आवाज ऐकायला मिळतात. याद्वारे कथा नेमकी कशी असेल याचा अंदाज बांधू शकता. यात रणबीर म्हणतो की, ”असे कोणते अस्त्र आहे जे तुकड्या-तुकड्यांमध्ये आहे आणि एकत्र जोडले गेले की दोन गोल पूर्ण होतील व त्याच्यावर एक निशाणही आहे?’ रणबीरच्या प्रश्नानंतर अमिताभ बच्चन यांचा आवाज येतो व त्यानंतर आलियाचा आवाज ऐकायला मिळतो. तसेच यामध्ये डायलॉगसह लोगो इफेक्ट आणि ग्राफिक्सचाही वापर करण्यात आला आहे.

brahmastra-movie1

तीन भागांत येणार चित्रपट
मोशन पोस्टरवरून स्पष्ट होत आहे का हा चित्रपट आतापर्यंत आलेल्या बॉलिवूडपटांपेक्षा नक्कीच वेगळा असणार आहे. यामध्ये प्रेक्षकांना आधुनिकतेसह इतिहासाशी मिळताजुळता तडकाही पाहायला मिळणार आहे. यासह पोस्टरवर प्रदर्शनाची तारीखही दिसून येत आहे. तीन भागांमध्ये बनणाऱ्या या चित्रपटाचा पहिला भाग नाताळमध्ये प्रदर्शित होईल. यात रणबीर कपूर, अमिताभ बच्चन आणि आलिया भट्ट यांच्या प्रमुख भूमिका आहेत. बिग बी यांनी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक फोटोही शेअर केला होता.

brahmastra