पोलीस पाटलासह चार जणांना विषबाधा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । कोपरगाव

कोपरगाव तालुक्यातील टाकळी गावात गव्हाच्या पिठातून धोतऱ्याचे बी खाण्यात आल्याने किरकोळ विषबाधा झाल्याने पोलीस पाटलासह चार जणांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर सर्वांची प्रकृती ठिक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

पोलीस पाटील राजेंद्र निवृत्ती (५१ ), मनीषा देवकर (३५ ), निवृत्ती गिरजू देवकर (७८ ), परिघा बाई निवृत्ती देवकर (७२ ), प्रतीक्षा जितेन्द्र वावधाने (२२ ) यांना क्रिटीकल सेंटर दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या तब्येतीत लक्षणीय सुधारणा झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. वेदात व श्रुतिका ही या कुटुंबातील दोन मुले शाळेत गेल्याने वाचली.