
सामना प्रतिनिधी । राहाता
राहाता शहरातील मानाची होळी यंदा विरभद्र देवस्थानचे पुजारी सर्जेराव भगत यांच्या हस्ते पेटवून माना पानावरून होणारे ‘मान-पान नाट्य’ थांबवण्यात आले.
राहाता शहरातील मानाची होळी गणेश चौकात पेटविली जाते. दोन गटातील मानपान नाट्यामुळे गेल्या वर्षी मोठा वाद होऊन दोन होळ्या पोलीस बंदोबस्तात पेटविण्यात आल्या होत्या होत्या. त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून विरभद्र देवस्थानचे अध्यक्ष सागर सदाफळ व जेष्ट कार्यकर्ते मोहनराव सदाफळ यांनी दोन्ही गटाशी चर्चा करून ग्रामस्थांच्या वतीने एकच होळी पेटविण्याचा निर्णय घेतला. तसेच होळी देवस्थानचे पुजारी यांच्या हस्ते पेटविण्याचे सर्वानुमते ठरले. त्याला सर्वांनी सहमती दिली.
सायंकाळी या होळीची वेद शास्र संपन्न अनंत गुरू लावर यांनी विधीवत पुजा केली व मंदिराचे पुजारी सर्जेराव भगत यांच्या हस्ते होळी पेटविण्यात आली.
यावेळी राहात्याच्या नगराध्यक्षा ममता पिपाडा, विरभद्र देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सागर सदाफळ, उपनगराध्यक्ष राजेंद्र पठारे, माजी नगराध्यक्ष कैलास सदाफळ, राजेंद्र पिपाडा, मोहनराव सदाफळ, राजेंद्र गायकवाड, पोपट कोल्हे, बाळासाहेब नवाळे, चांगदेव गिधाड, सतिष बोठे, संतोष सदाफळ, अनिल बोठे, बाळासाहेब सदाफळ, बाळासाहेब सोनटक्के, शिवसेनेचे राजेंद्र अग्रवाल, बाळासाहेब गिधाड, अरविंद गाडेकर, किरन गुरू लावर, निवृत्ती बनकर आदी प्रमुख यावेळी उपस्थीत होते.




























































