Lok Sabha 2019 भाजपची चौथी यादी जाहीर, 46 उमेदवारांची घोषणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

भाजपने लोकसभा निवडणूकीच्या उमेदवारांची चौथी यादी आज जाहीर केली. य़ात देशभरातील 46 उमेदवारांची घोषणा करण्यात आली. केंद्रीय मंत्री जे. पी नड्डा यांनी ही यादी जाहीर केली.

चौथ्या यादीत उत्तर गोव्यातून श्रीपाद नाईक यांना उमेदवारी देण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांना मोरेना तर अनुराग ठाकूर यांना हमीरपूर मतदार संघातून तिकीट देण्यात आले आहे. जयंत सिन्हा – हझारीबाग, जनार्दन मिश्रा – रेवा, राकेश सिंग – जबलपूर, सुरेश कश्यप-शिमला, किशन कपूर- कांग्रा, निशिकांत दुबे – गोड्डा यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.