आघाडीत बिघाडी, राष्ट्रवादीचा प्रचार करण्यास राधाकृष्ण विखे पाटील यांचा नकार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नगर

विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे यांनी नगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार करणार नाही अशी भूमिका जाहीर केल्यामुळे आघाडीमध्ये चांगलाच असंतोष निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे. काँग्रेसमध्येच आता प्रचारावरुन बिघाडीचे वातावरण होण्यास सुरवात झाली आहे. आता उत्तरेचे ताकद काँग्रेसला पणाला लावल्या शिवाय पर्यायच उरला नाही.

विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे यांनी नगर जिल्ह्यात मी कोणाचाही प्रचार करणार नाही अशी ठाम भूमिका स्पष्ट केल्याने चांगलीच तारंबळ उडाली आहे. राजकारण आता कोणत्या टप्प्यावर वळण घेईल हे सांगता येत नसल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात काँग्रेसची ताकद मोठी असून दक्षिणेमध्ये विखे प्रचार करणार की नाही केला तर कुणाचा करणार असाही प्रश्‍न आता उपस्थित होताना दिसत आहे.

जिल्हा परिषदेत काँग्रेस राष्ट्रवादीच सत्ता आहे. सध्या अध्यक्षपद हे काँग्रेसकडे आहे. शालीनीताई विखे या विद्यमान अध्यक्षा आहे तर राष्ट्रवादीच्या राजश्री घुले या उपाध्यक्षा आहेत. नगरची जागा ही भाजपाकडून आता सुजय विखे लढविणार असल्याने आता जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनीताई विखे यांची भूमिका महत्त्वाची राहणार आहे. सध्या जिल्हा परिषदेत काँग्रसेच 23, राष्ट्रवादीचे 19, भाजपाचे 14 , शिवसेनेचे 9, क्रांतीकारी दलाचे 5, तर अपक्ष 4 असे संख्याबळ आहे. काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडी असल्यामुळे जरी दोन्ही एकत्र असले तरी मात्र आता काँग्रेस आता निवडणुकीत काय भूमिका घेते हे पहावे लागणार आहे कारण राधाकृष्ण विखे यांना माननारा गट हा दक्षिणेतसुध्दा मोठया प्रमाणावर आहे. पण दुसरीकडे थोरात गटालासुध्दा जिल्हापरिषदेत संधी देण्यात आलेली आहे. विखे थोरात वादाची झालर जरी पक्षाला आहे त्याच प्रकारची आता जिल्हा परिषदेतसुध्दा अंतर्गत सुरु झाली आहे.

दक्षिणेमध्ये राष्ट्रवादीचे प्राबल्य जरी जिल्हा परिषदेत असले तरी काँग्रेस मात्र, द्विधा मनस्थितीत सापडली आहे. नेमकी भूमिका घ्यावायची कशी असा प्रश्‍न सदस्यापुढे उभा ठाकला आहे. गेल्या वर्षभराच्या जिपच्या कारभारातुन विखेंनी विकासाच्या अनेक कामांना निधी उपलब्ध करुन दिला आहे. त्यामुळे दक्षिणेत सध्या आघाडीची बिघाडी डोकेदुखी ठरणार आहे. त्यामुळे ऐनवेळेला अनेक घडामोडी घडण्याची शक्यता आहे.

विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे यांनी आता प्रचार न करण्याची भूमिका घेतल्यामुळे काँग्रेसमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. विखे व थोरात गट आता दक्षिणेत उघडपणे दिसू लागले आहे याचा फटका कोणाला बसणार हे पाहणे उचित ठरणार आहे.