सामना प्रतिनिधी, लातूर
41-लातूर (अ.जा.) लोकसभा मतदार संघासाठी उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे दिनांक 29 मार्च 2019 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जी. श्रीकांत यांच्या समक्ष 2 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने लातूर लोकसभेसाठी 10 उमेदवार अंतिम झालेले आहेत.
अंतिम उमेदवारांची नावे पुढील प्रमाणे- रमेश निवृत्ती कांबळे- अपक्ष, सुधाकर तुकाराम श्रृंगारे-भाजपा, सिध्दार्थकुमार दिगंबर सुर्यवंशी- बसपा, अरुण रामराव सोनटक्के- बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी, दत्तु प्रभाकर करंजीकर- बहुजन मुक्ती पार्टी, रामराव नरसिंग गारकर- वंचित बहुजन आघाडी, मधुकर संभाजी कांबळे- अपक्ष, मच्छिंद्र गुणाजी कामत उर्फ गुणवंतराव- भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, पपिता रावसाहेब रणदिवे- अपक्ष, रुपेश शामराव शंके- स्वतंत्र भारत पक्ष. उपरोक्त दहा उमेदवार हे लातूर लोकसभा निवडणुकीसाठी अंतिम ठरलेले आहेत, असे जिल्हा निवडणूक प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे.





























































