
श्रमजीवी, बुद्धिजीवी हे शब्द आपल्या खूप परिचयाचे आहेत. मात्र, गेल्या काही वर्षात ‘आंदोलनजीवी’ ही नवीन जमात उदयाला आली आहे. या लोकांची एक टोळी आहे. हे लोक आंदोलनाशिवाय जगूच शकत नाहीत, असे टीकास्त्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्यसभेत केले. दरम्यान, शेतीमालाची किमान आधारभूत किंमत (एमएसपी) आहे आणि कायम राहणार, असे आश्वासनही त्यांनी दिले. दरम्यान, पंतप्रधानांच्या वक्तव्यावरून टीका होत असून आंदोलन करणाऱया शेतकऱयांचा हा अपमान आहे, अशा प्रतिक्रिया उमटत आहेत.
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत उत्तर दिले. तीन कृषी कायदे रद्द करावे या मागणीसाठी थंडी-पावसात 75 दिवसांपासून दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करणाऱया शेतकऱयांच्या प्रश्नावर ठोस आश्वासन पंतप्रधानांनी दिले नाही. यावेळी त्यांनी कोरोनापासून शेतकरी आंदोलन, कृषी कायदे यावर भाष्य केले. काही नेत्यांच्या वक्तव्यांचा संदर्भ देऊन विरोधकांवर टीका केली.
पंतप्रधान काय म्हणाले?
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या जुन्या वक्तव्याचा संदर्भ पंतप्रधान मोदी यांनी दिला. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही कृषीक्षेत्रात सुधारणांबाबत भूमिका मांडल्याचे त्यांनी सांगितले. कृषी कायद्यासंदर्भात काँग्रेसने आता भूमिका बदलली. विरोधकांनी आता यूटर्न घेतला आहे. उलट काँग्रेसला अभिमान वाटला पाहिजे की जे डॉ. मनमोहन सिंग बोलले होते ते मोदींना करावे लागत आहे. त्याचे श्रेय तर काँग्रेसने घ्यावे, असे पंतप्रधान म्हणाले.
आंदोलन मागे घ्या; चर्चेतून मार्ग काढू
- कृषी कायदे लहान शेतकऱयांच्या मदतीसाठी असल्याचे, असे सांगताना पंतप्रधान मोदी यांनी दिवंगत माजी पंतप्रधान चरण सिंह यांच्या वक्तव्याचा हवाला दिला.
- आंदोलन करण्याचा शेतकऱयांचा अधिकार आहे; पण वृद्धांनी घरी परतावे. शेतकऱयांनी आंदोलन मागे घ्यावे. आपण एकत्रितपणे मार्ग काढू. चर्चेतून हा प्रश्न सोडवू. चर्चेसाठी सरकार तयार आहे, असे मोदी म्हणाले.
देश विश्वासावर नाही, तर कायद्यावर चालतो
पंतप्रधान मोदींनी एमएसपीकर आश्कासन दिलं. तसंच कृषी उत्पन> बाजार समित्यांना आधुनिक स्करूप दिले जाईल, असं सांगितलं. पण एमएसपीकर सरकार कायदा करणार की नाही, हे मात्र त्यांनी स्पष्ट केलं नाही. देश फक्त किश्कासाकर चालत नाही. तर देश हा घटना आणि कायद्यावर चालतो, अशी प्रतिक्रिया शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी पंतप्रधानांच्या संसदेतील भाषणावर व्यक्त केली आहे.
वकिलांचे असो की कामगार, विद्यार्थ्यांचे आंदोलन हे ‘आंदोलनजीवी’ सर्व ठिकाणी हजर असतात. कधी पडद्यामागे, तर कधी पडद्याच्या पुढे असतात.
– नरेंद्र मोदी, पंतप्रधान



























































